SAMYAK PUNE

Welcome To

SAMYAK TRUST

सर्व धर्म समभाव

SAMYAK TRUST | सम्यक ट्रस्ट

सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना संस्थेच्या माध्यमातून ठोस स्वरूपाच्या कार्यक्रमाद्वारे समाजसेवा करण्याच्या हेतूने. आज पर्यंत च्या अनुभवातून समाज परिवर्तनाच्या वाटेवर राजकारण अथवा तत्सम सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काम करण्यासाठी येणाऱ्या मर्यादा लक्ष्यात घेवून परिवर्तनवादी चळवळीमधून काम करणाऱ्या रोहिदास गायकवाड, का. क . नवनाथ कांबळे व बाळासाहेब जानराव या कार्यकर्त्यांच्या चर्च मधून अश्या एखाद्या संस्थेच्या माध्यमातून भरीव व रेखीव ठोस स्वरूपाचे कार्य करण्यासाठी संस्थेची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले.... अधिक जाणून घ्या

सम्यक संस्थेचे उद्देश

शैक्षणिक - संस्थेच्या कार्यक्षेत्रात बालवाडी पासून महाविद्यालयापर्यंत सर्वप्रकारच्या शिक्षणसंस्था स्थापण करणे. कोचिंग क्लासेस सुरु करणे . गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या व शालोपयोगी साहित्याचे वाटप करणे, कार्यक्षेत्रात वाचनालय, ग्रंथालय , वसतिगृहे सुरु करणे. विद्यार्थ्यांना करियर डेव्हलपमेंट साठी स्पर्धात्मक परिक्षा घेऊन महत्वाच्या परीक्षांसाठी त्यांच्या कडून तयारी करून घेणे . तंत्रशिक्षणाद्वारे टर्नर , फिटर , कॉम्पुटर , इलेकट्रिशिअन , तसेच टीव्ही , मोबाइल, दुचाकी वाहने इ . दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देणे

वैद्यकीय - कार्यक्षेत्रातील आजारी व गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातील , विविध आरोग्य शिबिरांचे , लसीकरण मोहीमांचे आयोजन केले जाईल . तसेच रक्तदान शिबीर , कॅन्सर , टीबी सारखे दुश्चर रोग तसेच एड्स कुटुंब नियोजन या विषयी जनजागरणाची मोहीम हाती घेणे . प्रथमोपचार केंद्र , फिरता दवाखाना सुरु करणे, रुग्णवाहिका सुरु करणे. असाध्य रोगांच्या उपचाराकरिता शक्यतो सर्व आर्थिक , वैद्यकीय मदत करणे . गरजूना चष्मे , व्हीलचेअर , अपंगांना कुत्रिम अवयव , समाजातील गरीब व गरजू रुग्णांना रुग्णउपयोगी साहित्याचे वाटप करणे.

उद्योग विषयक - तरुणांमध्ये उद्योजक प्रवृत्ती वाढावी यासाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरु करणे, भांडवल विषयक मार्गदर्शन करणे. स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग सेंटर सुरु करून तरुणांना तांत्रिक प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणे . त्यांना व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.

महिला विषयक - महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आर्थिक दृष्ट्या विकास करणे , त्यांना गृहउद्योग, कुटीरउद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे . त्यांना विविध उद्योगांचे उदा. पापड, लोणचे , मसाले अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ , पाककला इ. बाबत उतपादन , वितरण , बाजारपेठ इ. प्रशिक्षण देणे व मार्गदर्शन करणे महिलांच्या कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणे मोफत सल्ला केंद्र चालवणे , महिलांसाठी बचतगट स्थापन करणे , महिलांसाठी महिलांहचे वसतिगृह , पाळणाघर सुरु करणे. महिलांना सबळ व समाजाभिमुख करण्यासाठी प्रयत्न... अधिक जाणून घ्या

Address:
ग्राफिकॉन आर्केड ऑफिस नं. २०, २१, ससुन रोड, जहांगीर हाॅस्पिटल समोर पुणे - १.

नोंदणी क्र . महाराष्ट्र । ३९९।२००५। पुणे
Other Websites
www.sanvidhansspune.in