SAMYAK PUNE

About SAMYAK

About SAMYAK

सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना संस्थेच्या माध्यमातून ठोस स्वरूपाच्या कार्यक्रमाद्वारे समाजसेवा करण्याच्या हेतूने. आज पर्यंत च्या अनुभवातून समाज परिवर्तनाच्या वाटेवर राजकारण अथवा तत्सम सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काम करण्यासाठी येणाऱ्या मर्यादा लक्ष्यात घेवून परिवर्तनवादी चळवळीमधून काम करणाऱ्या रोहिदास गायकवाड, का. क . नवनाथ कांबळे व बाळासाहेब जानराव या कार्यकर्त्यांच्या चर्च मधून अश्या एखाद्या संस्थेच्या माध्यमातून भरीव व रेखीव ठोस स्वरूपाचे कार्य करण्यासाठी संस्थेची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात सामाजिक व राजकीय संघटनेमध्ये काम करताना अशा संस्थेची आवश्यकता व त्या दृष्टीने काम करण्याचे ठरविण्यात आले. जानेवारी २००५ मध्ये 'सम्यक ' या संस्थेची स्थापना करण्याचे ठरले. त्याची नोंदणी प्रक्रिया त्याचे स्वरूप व कार्यपद्धती यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सोबत काम करीत असलेल्या सक्रिय कार्यकर्त्यांना याची माहिती देण्यात अली व ज्यांना सोबत यायची व विधायक काम करण्याची इच्छा आहे. अश्या सहकाऱ्यांची निवड करण्यात आली अन १० स्टेव्हली रोड कॅम्प पुणे येथे सम्यक या संस्थेची स्थापना करण्यात आली.

दि . २९-०३-२००५ रोजी संस्थेची रितसर नोंदणी करण्यात आली तसे प्रमाणपत्र मिळाले. नोंदणी क्र . महाराष्ट्र । ३९९।२००५। पुणे ऑगस्ट २००५ मध्ये संस्थेला एक - २१३०६, पुणे . नोंदणी प्रमाणपत्र मिळाले

Other Websites
www.sanvidhansspune.in