SAMYAK PUNE

सम्यक संस्थेचे उद्देेश

सम्यक संस्थेचे उद्देश

शैक्षणिक - संस्थेच्या कार्यक्षेत्रात बालवाडी पासून महाविद्यालयापर्यंत सर्वप्रकारच्या शिक्षणसंस्था स्थापण करणे. कोचिंग क्लासेस सुरु करणे . गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या व शालोपयोगी साहित्याचे वाटप करणे, कार्यक्षेत्रात वाचनालय, ग्रंथालय , वसतिगृहे सुरु करणे. विद्यार्थ्यांना करियर डेव्हलपमेंट साठी स्पर्धात्मक परिक्षा घेऊन महत्वाच्या परीक्षांसाठी त्यांच्या कडून तयारी करून घेणे . तंत्रशिक्षणाद्वारे टर्नर , फिटर , कॉम्पुटर , इलेकट्रिशिअन , तसेच टीव्ही , मोबाइल, दुचाकी वाहने इ . दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देणे

वैद्यकीय - कार्यक्षेत्रातील आजारी व गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातील , विविध आरोग्य शिबिरांचे , लसीकरण मोहीमांचे आयोजन केले जाईल . तसेच रक्तदान शिबीर , कॅन्सर , टीबी सारखे दुश्चर रोग तसेच एड्स कुटुंब नियोजन या विषयी जनजागरणाची मोहीम हाती घेणे . प्रथमोपचार केंद्र , फिरता दवाखाना सुरु करणे, रुग्णवाहिका सुरु करणे. असाध्य रोगांच्या उपचाराकरिता शक्यतो सर्व आर्थिक , वैद्यकीय मदत करणे . गरजूना चष्मे , व्हीलचेअर , अपंगांना कुत्रिम अवयव , समाजातील गरीब व गरजू रुग्णांना रुग्णउपयोगी साहित्याचे वाटप करणे.

उद्योग विषयक - तरुणांमध्ये उद्योजक प्रवृत्ती वाढावी यासाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरु करणे, भांडवल विषयक मार्गदर्शन करणे. स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग सेंटर सुरु करून तरुणांना तांत्रिक प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणे . त्यांना व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.

महिला विषयक - महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आर्थिक दृष्ट्या विकास करणे , त्यांना गृहउद्योग, कुटीरउद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे . त्यांना विविध उद्योगांचे उदा. पापड, लोणचे , मसाले अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ , पाककला इ. बाबत उतपादन , वितरण , बाजारपेठ इ. प्रशिक्षण देणे व मार्गदर्शन करणे महिलांच्या कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणे मोफत सल्ला केंद्र चालवणे , महिलांसाठी बचतगट स्थापन करणे , महिलांसाठी महिलांहचे वसतिगृह , पाळणाघर सुरु करणे. महिलांना सबळ व समाजाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करणे. महिला व बालकल्याण विभागाच्या व इतर शासन पुरस्कृत योजना राबविणे.

क्रिडा व आरोग्य विषयक - शारीरिक तंदुरुस्तीसाठी समाजातील सर्व वयोगटातील स्त्रीपुरुष व युवांसाठी अत्याधुनिक व्यायामसाहित्याने सुसज्जीत अशी व्यायामशाळा (जिम) सुरु करणे . मैदानी खेळांच्या प्रचार व प्रसाराकरिता विविध स्तरांवर देशी, विदेशी खेळांच्या स्पर्धा आयोजित करून विजेत्या खेळाडूंना व संघांना प्रतिष्ठाण तर्फे बक्षिसे प्रदान करून त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. तसेच विविध खेळाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील. योगासन वर्ग आयोजित केले जातील.

सामाजिक - सामाजिक उद्धारासाठी संस्थेतर्फे अध्यात्मिक प्रवचने, भजन, कीर्तन, ध्यानधारणा , सत्संग शिबीर यासारखे उपक्रम हाती घेतले जातील. तसेच निसर्गोपचार केंद्रे , व्यसनमुक्ती केंद्रे , निराधार व गरजूसाठी वृद्धाश्रम सुरु केले जातील. तसेच समाजासाठी सर्वधर्मसमभाव, बंधुभाव , जिव्हाळा , सामाजिक ऐक्य, राष्ट्रप्रेम ए. भावनांची जोपासना करण्यासाठी राष्ट्रीय व सामाजिक उत्सवांचे आयोजन करणे. राष्ट्रपुरुषांच्या जीवनावर आधारित व्याख्यानयाला आयोजित करून समाजप्रबोधन करणे.

विधायक उपक्रम - समाजातील अनिष्ट प्रथा चालीरीती , अंधश्रद्धा विरोधात ,जनजागरण करणे . सामूहिक विवाह, साक्षरता प्रसार , सामाजिक वनीकरण , श्रमदान शिबिरे, निराधार वृद्धांची सेवा करणे, वन्य प्राणी, पक्षी यांचे रक्षण करणे . पशुपक्षी यांच्यासाठी औषधालय व व्याखाने सुरु करणे, सार्वजनिक स्वछता मोहीम राबविणे, आपद्ग्रस्तांना मदत करणे यांसारखे उपक्रम राबविणे , तसेच लोकसंख्या, पाणी, वीज, निरक्षरता, व्यसनाधीनता , पर्यावरण, रहदारी, एड्स सारख्या ज्व लंत प्रश्नाबाबत चर्चासत्र , कार्यशाळा (सेमिनार) आयोजित करणे तसेच संस्थेतर्फे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा इ. क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा व संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव करणे.

कला व सांस्कृतिक - सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सामाजिक सुधारणांचा प्रचार व प्रसार करणे. गायन, वादन व अभिनय या कलांचा व कलाकारांचा सन्मान करणे व प्रोत्साहन देणे. नाट्यकरण,सिनेक्षेत्र त्याचप्रमाणे दूरचित्रवाणी माध्यमांद्वारे सामाजिक सुधारणांचा प्रचार करणे, दूरचित्रवाहिणी सुरु करणे, साप्ताहिक, मासिक इ. सुरु करणे. लोकगीत, लोकसंगीत, लोकनाट्य आदी पारंपरिक कलाप्रकारांना प्रोत्साहन देणे त्यांच्या संवर्धनासाठी सर्व प्रयत्न करणे.

Other Websites
www.sanvidhansspune.in